अटी व शर्थी

१.⁠ ⁠युजरनेम व पासवर्ड बाबत संपूर्ण गुप्तता पाळण्याची जबाबदारी सभासदाची असेल.
2.⁠ ⁠युजरनेम व पासवर्ड चा त्रयस्थाने गैरफायदा घेतल्यास त्यास संबंधित सभासद जबाबदार राहील.
3.⁠ ⁠वेबसाईटवरील माहितीची सत्यता तपासणी व पडताळणी करण्याची जबाबदारी केवळ सभासदावर असेल.
4.⁠ ⁠तुलसी मॅट्रिमोनी केवळ स्थळांची उपलब्ध व सकृत दर्शनी असलेली माहिती देते, त्यामुळे कुठल्याही सभासदाने चुकीची माहिती किंवा कागदपत्रे दिल्यास त्याची जबाबदारी तुलसी मॅट्रिमोनीची नसेल.
5.⁠ ⁠सभासदांनी दिलेली माहिती असत्य किंवा चुकीची आढळल्यास किंवा कागदपत्रे बनावट दिसून आल्यास सदरील सभासदाचे सदस्यत्व तात्पुरते किंवा कायम बंद करण्याचे अधिकार तुलसी मॅट्रिमोनीचे असतील व अशा परिस्थितीत नोंदणी शुल्क परत केले जाणार नाही.
6.⁠ ⁠नोंदणी फॉर्म मधील मूलभूत माहिती मध्ये (जसे की जन्मतारीख, नाव, पत्ता, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर) यामध्ये कुठलाही बदल सभासदास करता येणार नाही. असा बदल करावयाचा असल्यास सभासदांनी तुलसी मॅट्रिमोनीच्या वेबसाईटवर नोंदणीकृत ईमेल आयडीवर त्याची लेखी स्वरूपात विनंती करावी लागेल.
7.⁠ ⁠तुलसी मेट्रोमोनी केवळ उपवर वधू-वरांच्या स्थळांची माहिती देते. मात्र त्या पुढील विवाह संबंधाच्या अनुषंगाने कराव्या लागणाऱ्या सर्व बाबी सभासद आपल्या जबाबदारीवर करतील.